Share

मुंबईच्या ताफ्यात आल्यानंतर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : काल अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएलच्या १४ व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सचिन तेंडुलकचा सुपुत्र पहिल्यांदाच आयपीएल लिलावात सामील होणार असल्याने अनेक क्रिकेट रसिकांच्या त्यांच्या लिलावाकडे लक्ष्य लागलं होतं.

अखेर अर्जुनवर बोली लागली. मुंबई इंडियन्सनेच त्याच्यावर बोली लावत २० लाखांमध्ये त्याला खरेदी केलं आहे. दरम्यान, विशेष बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात सर्वात मोठी बोली आज लावली गेली. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत. आयपीएलच्या इतिहासात लिलावामध्ये सर्वात मोठी बोली लावलेली ही किंमत आहे. १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये संधी मिळाल्याने आणि मुंबईसारख्या तगड्या संघाने खरेदी केल्यानंतर अर्जुन तेंडुलकरही चांगलाच आनंदात आहे.

लिलावानंतर मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन अर्जुनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘मी लहानपणापासून मुंबई इंडियन्सचा खूप मोठा चाहता राहिलोय..माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि संघ मालकांचे आभार मानतो. मुंबई पलटनमध्ये सहभागी होण्यास मी खूपच उत्सुक आहे आणि ब्लू गोल्ड जर्सी घालण्याची आतुरतेने वाट बघतोय’, अशी प्रतिक्रिया अर्जुनने दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!