Share

चिंतेत वाढ : महाराष्ट्रात ‘कोरोना’चा वेगाने होतोय फैलाव…

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या १३६४ वर पोहचली आहे. तर आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने ९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात २२९ करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यामुळे ही संख्या वाढली आहे.

राज्यात गुरुवारी आणखी २१६ कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्यातील सर्वाधिक १६२ रुग्णांची नोंद मुंबईत झाली. राज्यातील मृत्यूचा आकडा १०२ वर गेला; तर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मृतांचा आकडा ६६ वर पोहोचला. मुंबई व दिल्ली ही शहरे नवे हॉटस्पॉट ठरली आहेत. मुंबई शहर, उपनगर जिल्हा, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

तसेच काल झालेल्या मृत्यूपैकी पुण्यातील 14 मुंबईतील 9, मालेगाव, रत्नागिरी येथील एकाचा समावेश आहे. यामध्ये 15 पुरुष आणि 10 महिलांचा समावेश आहे. काल झालेल्या मृत्यूपैकी 12 जण 60 वर्षांपुढील आहेत. तर मुंबईतील एका महिलेचं वय 101 वर्ष आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 वयोगटातील आहे. तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. मृत्यू झालेल्या रुग्णापैकी 21 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे आजार आढळले आहेत.

दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्तोपरी मेहनत घेतली जात आहे. देशभरातील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलीस रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!