🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या संकटात सर्वांना पुढे घेऊन जाण्यासाठी आता बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (बिग बी) यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ऑल इंडिया फिल्म एंप्लॉइज कन्फेडरेशनशी निगडीत एक लाख मजदूरांच्या कुटुंबियांना महिन्याभराचं राशन पुरवण्याचा संकल्प केला आहे. या मदत कार्यात सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएन) आणि कल्याण ज्वेलर्स यांचा देखील हातभार असणार आहे.
सोनी पिक्चर्स नेटवर्कने रविवारी जारी केलेल्या माहितीनुसार, ‘ज्या गंभीर स्थितीत आपण आहोत, त्यामध्ये श्रीमान बच्चन यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला संकल्प ‘व्ही आर वन’चं सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया आणि कल्याण ज्वेलर्सने समर्थन केलं आहे. यामार्फत देशभरातील एक लाख कुटुंबांना महिन्याभराच्या राशनसाठी वित्तपोषण देण्यात येणार आहे.’
T 3492 -YOU , yes YOU ! आप ही से बात कर रहा हूँ मैं ! LISTEN TO ME ! इस CORONA बीमारी को समझो ! घर में रहो ! बाहर मत निकलो !???? हाथ जोड़ रहा हूँ मैं ! ये virus अपना घर ढूँड रहा है , और वो घर उसे इंसानों के अंदर मिलता है ! अपने घर का दरवाज़ा बंद कर दो । घुसने ना पाए । pic.twitter.com/VpdAxlS10A
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 5, 2020
दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या आधी शाहरूख खानने देखील मदत करणार असल्याची घोषणा केली होती. त्याने आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. या सर्व सेलीब्रेटींंनी मदती बरोबरच आपल्या चाहत्यांना घरी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

