नवी दिल्ली : ‘कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची आणि कोरोना संशयितांशी चाचणी करण्यासाठी तपासणीच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत,’ असं मत काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मांडले.
देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 194 पेक्षा अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी जनतेला कोरोनाला न घाबरता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्या माध्यमांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी चाचणी करणे, हा एक उत्तम उपाय आहे. देशामध्ये 130 कोटी लोक आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 15 हजार 701 लोकांची चाचणी झाली आहे. उर्वरित लोकांच्या सुरक्षेसाठी आपण इतर देशांकडून शिकण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव लहान व्यावसायिक आणि मजुरांवर पडला आहे. त्यासाठी सरकारने मदतीचं पॅकेजही जाहीर करावं, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

