Share

#coronavirus : ‘कोरोना’ विषाणूच्या रुग्णांसाठी काही खाटा राखून ठेवा; केंद्र सरकारचे आदेश

Published On: 

नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असली तरी अजूनही नियंत्रणातच आहे. मात्र रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीच तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी रुग्णालये सुसज्ज असायला हवीत, या दृष्टीने केंद्र सरकारने सूचना जारी केल्या आहेत.

तसेच कोरोना विषाणूच्या रुग्णांसाठी काही खाटा राखून ठेवून विलगीकरण कक्षांची सुविधा करण्यात यावी, अशा सूचना केंद्र सरकारने देशातील सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार पुरेशा संख्येने व्हेंटिलेटर्स, हायफ्लो आॅक्सिजन मास आणि अतिरिक्त मनुष्यबळ याची व्यवस्था करण्याच्या केंद्र सरकारने सूचना जारी केल्या आहेत.

दरम्यान, कुठल्याही परिस्थितीचा भविष्यात मुकाबला करणे शक्य व्हावे यासाठी आवश्यक संसाधने देशभर अधिकाधिक समान पातळीवर वितरित होणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!