मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या आता 12 झाली आहे. पुण्यात 9, मुंबईत 3, ठाणे आणि नागपुरात एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध आहेत याचा आढावा घ्यावा,’ अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, ‘रुग्णांची संख्या १२ झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणे कमी प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान, ‘पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणे येथे गर्दी नियंत्रण करताना व्यापक प्रमाणावर जनजागृती करावी. करोनाचे संकट उंबरठ्यापर्यंत आले आहे मात्र त्याला आत येऊ न देण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
