नवी दिल्ली : राज्यात गुरुवारी करोनाचे ७७८ नवे रुग्ण सापडले असून आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. यासोबत राज्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा हजारावर पोहोचली आहे. राज्यात सध्या ६४२७ करोनाबाधित रुग्ण आहेत. तर मृत्यू झालेल्यांची संख्या २८३ आहे. गुरुवारी १४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ८४० रुग्णांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.
आता महाराष्ट्रात ‘कोरोना’ला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊलं उचलले आहे. केंद्र सरकारने राज्यांत आणखी एक आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथक पाठविले आहे. तसेच या पथकांचे मुख्य लक्ष मुंबई, पुणे आणि नागपूरवर आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने येथे संसर्ग पसरण्याचा धोका आहे.
मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढतच असून गुरुवारी ४७८ रुग्ण आढळले. याच पार्श्वभूमीवर आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथके (आयएमसीटी) येथील स्थितीचा आढावा घेऊन गृहमंत्रालयाला अहवाल देतील. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहेत.
दरम्यान, या अहवालात स्थिती सुधारण्यासाठी ही पथके उपायही सुचवितील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. याआधी केंद्राने महाराष्ट्रात दोन पथके पाठवली होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

