मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊन पाळले गेले आहे. त्यामुळे राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार हे ठप्प झाले आहेत. मात्र आता गृह विभागाकडून ग्रामीण भागातील सहकारी संस्था सुरु करण्याला सुट मिळणार असल्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त news18 लोकमतने दिले आहे.
सहकारी पतसंस्था आणि ग्रामीण भागात येणार्या बिगर-बँकिंग वित्तीय संस्थांसह या कामांना सूट देण्यात आली असून त्यांना किमान कर्मचार्यांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बांधकाम कामांना 20 एप्रिलपासून सूट देण्यात येण्याची शक्यता आहे.
तसेच बांबू, नारळ, सुपारी, कोको आणि मसाल्यांच्या लागवडीपासून, कापणी, प्रक्रिया, पॅकेजिंग, विक्री तसेच लॉकडाऊनमधून होणार्या व्यवहारांना सरकारने सूट दिली आहे. त्याचबरोबर अनुसूचित जमाती व वनक्षेत्रात राहणाऱ्या लोकांकडून छोट्या वनोपयोगी व वन उत्पादनांचे संकलन, काढणी व प्रक्रिया करण्यास गृह सरकारने सूट दिली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

