Share

शरद पवारांचा ‘इशारा’; … तर पुढच्या पिढीला मोजावी लागेल किंमत!

Published On: 

मुंबई : ‘करोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. करोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका,’ असं राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दुसऱ्यांदा शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल’.

पुढे ते म्हणाले, ‘राज्याला पुरेल इतका अन्नधान्य साठा आहे. त्यामुळे जिथे आहात तिथे राहा. ऊसतोड कामगारांची व्यवस्था कारखानदारांनी करावी अशी सूचना केली आहे. मात्र, खेदजनक बाब म्हणजे अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे बाहेर फिरू नका,’ असं आवाहन पवार यांनी केलं.

दरम्यान, जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्याची गरज नाही. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपापल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी माहिती देत आहेत. त्यावर विश्वास ठेवा,’ असं देखील शरद पवार यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!