🕒 1 min read
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 22 मार्च ते 30 एप्रिल 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे महावितरणकडून वीजग्राहकांसाठी देखील दिलासा देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. महावितरणच्या घरगुती, व्यावसायिकसह इतर सर्वच वर्गवारीतील वीजग्राहकांना मार्च व एप्रिल महिन्यांचे वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश राऊत यांनी महावितरणला दिले आहेत.
यासोबतच महावितरणच्या सर्व वीजग्राहकांनी त्यांच्या वीज मीटरचे स्वतः रीडिंग घेऊन महावितरणच्या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपद्वारे अपलोड करावेत, असं आवाहन त्यांनी केले आहे. यामुळे वीजग्राहकांना अचूक मीटर रीडिंगचे वीजबिल प्राप्त होईल, असं देखील त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, महावितरणने मार्च महिन्याचे बिल भरण्यास 15 मे 2020 तर एप्रिल-2020 चे वीजबिल भरण्यासाठी 31 मे 2020 ची अंतिम तारीख दिली आहे. यामुळे लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या राज्यातील महावितरणच्या वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
