🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोनाच्या बळींबाबत आता अमेरिकेने इटलीलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत 26,047 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेत दिले होते.
तसेच जगभरात फैलाव होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल भूमिका घेतली असा आरोप देखील ट्रम्प यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर ‘प्रशासनाला मी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचे निर्देश देत आहे. करोनाच्या प्रसाराची माहिती लपवणे व गैरव्यवस्थापन यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेची नेमकी काय भूमिका आहे, त्याची समीक्षा सुरु आहे” असे डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी WHO चा निधी रोखण्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
