Share

‘लक्षणे न दिसतानाही प्रसार होणे ‘कोरोना’चा सर्वात मोठा धोका’

Published On: 

मुंबई : ‘कित्येक लोकांना नव्या विषाणूची लागण झाली तरी अनेक दिवस लक्षणे दिसत नाहीत. अशा लोकांकडून अजाणतेपणे इतरांना प्रादुर्भाव होतो. त्यामुळे कोणाला वेगळे ठेवायचे हेही कळत नाही. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असल्याने ही बाब चिंतेची आहे,’ असं जागतिक आघाडीचे विषाणूशास्त्रज्ञ व ‘लंडन स्कूल आॅफ हायजीन अण्ड ट्रॉपिकल मेडिसिन’चे संचालक डॉ. पीटर पिऑट यांनी कोरोना साथीबाबत माहिती दिली.

‘८० टक्के व्यक्तींना किरकोळ सर्दी-खोकला होतो. तेही वेगळे राहत नसल्याने इतरांना लागण होते. याची लक्षणे फ्लूसारखीच दिसतात,’ असं जागतिक आघाडीचे विषाणूशास्त्रज्ञ व ‘लंडन स्कूल आॅफ हायजीन अण्ड ट्रॉपिकल मेडिसिन’चे संचालक डॉ. पीटर पिऑट यांनी कोरोना साथीबाबत माहिती दिली.

‘महत्त्वाचा फरक म्हणजे लागण झाल्यावर सुरुवातीस या विषाणूंचे वास्तव्य घशाच्या वरच्या भागात असल्याने याचा प्रादुर्भाव एकाकडून दुसऱ्यास सहज होऊ शकतो. या काळात व्यक्तीचा घसा हे या विषाणूंचे आगर असते. त्यामुळे अशी व्यक्ती खोकली किंवा शिंकली तरी अब्जावधी विषाणू इतरांना प्रादुर्भाव करू शकतात,’ अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. लोकमत’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, भारतात महाराष्ट्रात 64, केरळमध्ये 52, दिल्लीत 26, उत्तर प्रदेशमध्ये 24, तेलंगणामध्ये 21, राजस्थानमध्ये 17, हरियाणामध्ये 17, कर्नाटकमध्ये 15, पंजाबमध्ये 13, लडाखमध्ये 13 रुग्ण आढळले आहेत. यात सातत्याने वाढ होत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!