Share

देशातील सर्वात कमी वयाचा रुग्ण; तीन दिवसांच्या ‘तान्ह्या’ बाळाला ‘कोरोना’ची लागण

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मात्र आता एक धक्कादायक चित्र समोर आलं आहे. आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

२९ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता आपल्या पत्नीची प्रसुती झाली. त्यानंतर माझ्या पत्नीला आणि तान्ह्या बाळाला दुपारी १२.३० च्या सुमारास एका वैयक्तीक खोलीत हलवण्यात आलं. परंतु दुपारी २ च्या सुमारास एका परिचारिकेनं आम्हाला पुन्हा दुसरीकडे जाण्यास सांगितलं,” अशी माहिती महिलेच्या पतीनं दिली. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

पतीने या खासगी हॉस्पिटलवर आरोप केला आहे की, त्याच्या पत्नीला कोरोना रुग्णाच्या बाजूचा बेड दिला होता. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला कोरोनाची लागण झाली. याबाबतचं वृत्त एनबीटीने दिलं आहे. ज्या दिवशी माझ्या पत्नीला हॉस्पिटलला दाखल केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलला समजलं की, माझ्या पत्नीच्या बाजूला असणाऱ्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र त्यांनी हे आमच्यापासून लपवून ठेवलं असं पतीने सांगितले.

दरम्यान, ‘प्रकरण आणखी वाढलं त्यावेळी आम्हाला कोरोनाची टेस्ट करण्यास सांगितले. त्यासाठी आम्ही बीएमसीकडून ज्या खासगी लॅबना टेस्टची परवानगी दिली आहे त्यांना बोलावून सँपल दिलं. रिपोर्टनुसार माझी पत्नी आणि मुलगा दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. सध्या पत्नी आणि मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर त्याठिकाणी उपचार सुरु आहेत,’ असं पतीने सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!