Share

मुख्यमंत्री ठाकरेसाहेब आपला ‘बालहट्ट’ आणि ‘राजहट्ट’ सोडा : भाजप

Published On: 

मुंबई : राज्याला आर्थिक दुष्टचक्रातून वाचवण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो आणि कोस्टल रोडच्या कामाला सुरु करण्याची परवानगी दिली आहे.  याच पार्श्वभूमीवर भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य करत आरेमधील स्थगित असलेले मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरु   करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे.

ही विनंती किरीट सोमय्या यांनी व्हिडीओद्वारे केली आहे. तर हा व्हिडीओ आपल्या अधिकृत  ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध केला आहे.  यात सोमय्या म्हणाले की, गेल्या १४४ दिवसांपासून आरेमधील मेट्रो कारशेडचं कामकाज स्थगित केल्यामुळे जवळपास १ हजार ४४० कोटींचे नुकसान झाले आहे त्याचसोबत मेट्रोच्या कामालाही यामुळे विलंब होणार आहे. त्यामुळे बालहट्ट आणि राजहट्ट सोडून आरेमधील कारशेड कामावरील स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाकरे सरकार सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. यानंतर भाजपाच्या नेत्यांनी विनाशकाले विपरित बुद्धी असे म्हणत टीका केली होती. महाराष्ट्रातील शहरांच्या विकासासाठीही मी तेवढाच विचार करत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

मात्र हाच मुद्दा पुढे करत आता किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आरे कारशेडवरची स्थगिती उठवावी अशी विनंती केली आहे. तर आपले बालहट्ट आणि राजहट्ट देखील सोडा असा टोला   त्यांनी लगावला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!