मुंबई : राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. करोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर ‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याची ग्वाही देतानाच, साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे, एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
‘नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने घाबरू नये. स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गर्दी करू नये. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी करू नये. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरतात, त्यावर विश्वास ठेवू नये,’ असं आवाहन टोपे यांनी केलं.
दरम्यान, ‘राज्य सरकारने काढलेल्या या परिपत्रकातील निर्णयानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, सर्व नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत महाविद्यालये व व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र या दरम्यान १० व १२ वीच्या परिक्षा तसेच विश्वविद्यालयातील परिक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत. तर सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, आरोग्याची काळजी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

