🕒 1 min read
मुंबई : ‘सरकारी कार्यालयात २५ टक्के हजेरी असेल. जीवनावश्यक वस्तूंशिवाय अन्य दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला प्रतिसाद उत्तम आहे. काही ठिकाणी ऑफिस सुरू आहेत. परंतु आता मुंबई महानगर परिसरात, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूरमध्ये जीवनावश्यक सेवा सोडून सर्व बंद ठेवणार आहोत. ही बंदी ३१ मार्च पर्यंत असणार असून आज मध्यरात्रीपासून हे आदेश लागू होणार आहेत,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मातोश्रीवरुन सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘राज्यात कोरोना विषाणुंच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती आता फक्त 25 टक्क्यांवर आणण्यात आली आहे, तसंच मेडिकल, अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सर्वजण जनतेशी बोलत आहेत. खबरदारीचा उपाय घेण्यास सांगितलं जात आहे घरी राहा. संपूर्ण जग जगण्यासाठी न थांबता धडपडत असतं. नाईलाजानं संपूर्ण जगाला आज घरात थांबण्याची वेळ आली आहे. अनेक संस्था, अनेकजण मदतीसाठी पुढे आले आहेत. सर्वजण आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. सर्वजण आपलं काम थांबवून मदतीला आले आहे. आपल्या चित्रपट सृष्टीतील दिग्गजांनी काही करण्याची भावना व्यक्त केली,’ असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, संकट येतं आणि जातं. पण, माणुसकी सोडू नका. हे संकट जाईल. त्यामुळे ज्याचं पोट हातावर आहे, त्याचं किमान वेतन कापू नका’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रातील उद्योजकांना आणि उद्योगांना आवाहन केलं आहे. तसेच सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला आहे,’ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
