नवी दिल्ली : देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. आता खासगी लॅबमध्येही लोक मोफत करोनाची चाचणी करु शकतात. आधी खासगी लॅबमध्ये करोनाच्या टेस्टसाठी ४ हजार ५०० रुपयांपर्यंतचे शुल्क आकारण्यास संमती होती.
मात्र आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे खासगी लॅबमध्येही चाचणी मोफत होईल असं म्हटलं आहे. वकील शशांक देव सुधी यांनी याचिक दाखल करत सरकाररच्या अधिसूचनेला आवाहन दिलं होतं. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या टेस्ट होणे गरजेचं आहे. त्यासाठी सरकारी रुग्णालयाप्रमाणे खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाचा तपासणी मोफत झाली पाहिजे, असं या याचिकेत म्हटलं होतं.
याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने याचिकेतील मागणी योग्य मानत खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरस चा हाहाकार दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाची टेस्ट मोफत झाली पाहिजे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.
तसेच या प्रकरणातल्या पुढल्या सुनावणी दरम्यान खासगी लॅबना या चाचण्यांसाठी काही विशिष्ट निधी द्यायचा का? यावर विचार केला जाईल. तूर्तास लोकांच्या चाचण्या मोफत होणं आवश्यक आहे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
