Share

ताकीद देऊनही कर्मचारी कामावर बोलावले, ठाकरे सरकारने दाखवला कंपनीला इंगा…

Published On: 

नाशिक : देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही सरकारने जमावबंदी लागू केली. १४४ कलम लागू असतानाही नाशिकच्या ‘डब्ल्यूएनएस’ कंपनीत दोन हजार कर्मचारी काम करत होते. त्यामुळे या बीपीओ आयटी कंपनीवर सरकारवाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. साथ रोग नियंत्रण कायद्याअंतर्गत या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कंपन्यांनी वर्क फ्रॉम सुविधा सुरु करावी, तसंच अर्ध्या कर्मचाऱ्यांवर काम करावं, असं आवाहन वारंवार करण्यात येत होतं. यानंतर राज्य सरकारने जमावबंदीही लागू केली. आता मात्र राज्यव्यापी कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.

देशातली रेल्वेसेवा ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला आहे. तसंच राज्यातील एसटी सेवादेखील बंद करण्यात आली आहे. लोकं ऐकत नसल्यामुळे राज्यव्यापी कर्फ्यू लावण्यात मजबूर असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!