🕒 1 min read
मुंबई : कोरोना रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. मात्र या साथीला पुन्हा डोके वर काढायला जराही वाव मिळू नये यासाठी देशव्यापी ‘लॉकडाउन’ येत्या ३ मेपर्यंत वाढविण्याची गोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली.
याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस ने पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक निशाणा साधला आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना सामान्य माणसाचे महत्वाचे प्रश्न अनुत्तरीतच आहेत,’ असे ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना सामान्य माणसाचे महत्वाचे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. गरीब आणि मजूर वर्गाचे पोट भाषणाने भरणार नाही, त्यांना राशन हवे आहे. त्यांना रोख आर्थिक मदत देण्याबाबत पंतप्रधान चकार शब्दही बोलले नाही.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) April 14, 2020
पुढे थोरात म्हणतात, ‘गरीब आणि मजूर वर्गाचे पोट भाषणाने भरणार नाही, त्यांना राशन हवे आहे. त्यांना रोख आर्थिक मदत देण्याबाबत पंतप्रधान चकार शब्दही बोलले नाही,’ असा आरोप थोरात यांनी केला आहे.
भारतात तीन में पर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आपल्याल तीच शिस्त पाळायची आहे. माझी सर्व देशवासियांना प्रार्थना आहे. कुठल्याही परिस्थिती आपल्याला कोरोनाला आता दुसऱ्या क्षेत्रात पसरु द्यायचे नाही. कोरोनामुळे कुठलाही मृत्यू झाल्यास चिंता वाढली पाहिजे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
