मुंबई : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६८ टक्के एवढा आहे. राज्यात बुधवारी ( १७ जून ) १३१५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५९ हजार १६६ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या ३३०७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५१ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४३ खाजगी अशा एकूण ९८ प्रयोगशाळा करोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७ लाख ९५४ नमुन्यांपैकी १ लाख १६ हजार ७५२ नमुने पॉझिटिव्ह (१६.६५ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८२ हजार ६९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५५ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५४५ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार ५८२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन:श्च हरी ओम म्हणत राज्यातल्या कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर रस्त्यावर पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी अशीच गर्दी झाली तर पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा दिला. यानंतर आता भिवंडीमध्ये १८ जून पासून पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू होणार आहे. भिवंडी शहरामध्ये पुढचे १५ दिवस लॉकडाऊन असेल.
भिवंडी शहरामध्ये १८ जूनपासून ३ जुलैपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येईल, असं महापालिका आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी सांगितलं. भिवंडीमधील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी पुन्हा लॉकडाऊन सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. महापौरांच्या या प्रस्तावाला सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर आयुक्तांनीही याला परवानगी दिली.
कुठे गेले अच्छे दिन ? सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ
लॉकडाऊनच्या काळात भिवंडीमध्ये दूध, मेडिकल आणि किराणा मालाची दुकानं ठराविक वेळेत सुरू राहतील. भिवंडीत मंगळवारपर्यंत ६५० कोरोनाग्रस्त सापडले आहेत, तर ३० जणांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात एका दिवसात ४५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ७०५ नवे रुग्ण आढळले आहेत. फक्त भिवंडी शहरात कोरोनामुळे एका दिवसात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात आत्तापर्यंत १७,८२३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५९५ जणांना जीव गमवावा लागला आहे.
जय हरी विठल … आता घर बसल्या असे घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

