Share

जय हरी विठल … आता घर बसल्या असे घ्या विठ्ठल-रुक्मिणीचे थेट दर्शन

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर.दि.17: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदीरही दर्शनासाठी बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना घर बसल्या विइ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदीर भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळाचा, गुगल प्ले स्टोअरमधून shreevitthalrukmnilive Darshan ॲप डाऊनलोड करावे तसेच जिओ टीव्ही वरील जिओ दर्शन आणि टाटा स्काय डीशवरील ॲक्टीव चॅनेल या माध्यमातून श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी नित्योपोचार पाहता येणार आहे.

01 जुलै 2020 रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही. भाविकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे. भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी जोशी यांनी केले आहे.

भगवान श्री रामाचे नाव घेऊन भाजपने केली लोकांची फसवणूक- प्रवीण तोगडिया

#corona : ‘ही’ आहे मुंबई महापालिकेची कोरोनासाठीची नवी टेस्टिंग स्ट्रॅटेजी

तुकाराम मुंढेवर होणार कायदेशीर कारवाई, नागपूरच्या महापौरांचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!