Share

कुठे गेले अच्छे दिन ? सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Published On: 

मुंबई : लॉकडाऊननंतर महागाई आपल्याला पूर्वीपेक्षा जास्त त्रास देणार हे आता स्पष्ट दिसत आहे. लॉकडाऊन सुरु होण्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घट झाली असली तरी आज १२ व्या दिवशीही ऑईल मार्केटींग कंपनीने भाव वाढविले आहेत. पेट्रोलच्या दरात ०.५३ रुपयांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या किंमती ०.६४ रुपयांनी वाढल्या आहेत. बुधवारी पेट्रोलचा दर वाढून ७७.८१ रुपये झाला. तर डिझेल दरही वाढविण्यात आला आहे. डिझेलची किंमत ७६.४३ रुपये प्रतिलिटर झाली.

मुंबईत पेट्रोल आता प्रतिलिटर ८४.६८ रुपये तर डिझेल ७४.३३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. त्याचबरोबर चेन्नईतील लोकांना एक लिटर पेट्रोलसाठी ८१.३९आणि डिझेलसाठी ७४.३३ रुपये मोजावे लागतील. तर कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत ७९.६१ आणि डिझेलची किंमत७१.९७ रुपयांवर पोहोचली आहे.

सोलापूरच्या पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारीही बदला, भाजपची आक्रमक मागणी

दुसरीकडे, कमी मागणीमुळे व्यापाऱ्यांनी आपली मागणीही कमी केली आहे. बुधवारी वायदा बाजारात कच्चा तेलाची किंमत १.१९ टक्क्यांनी घसरून २८९५ रुपये प्रति बॅरल झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये कच्चे तेलाची डिलिव्हरीची किंमत ३५ रुपयांनी किंवा ११.१९ टक्क्यांनी घसरून २८५९ रुपये प्रति बॅरल झाली.

पुन्हा लॉकडाउन होणार का ? छगन भुजबळांनी केला मोठा खुलासा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!