मुंबई : तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पाच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, सध्या अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांत तौत्के चक्रीवादळाचा परिणाम दिसण्यास सुरूवात झाली आहे. गोव्यानंतर आता चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणात दिसत आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. उद्या चक्रीवादळामुळे रायगड, मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना फटका बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्या म्हणजे १७ मे रोजी होणारं कोरोना लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील लसीकरण बंद राहणार असल्याचं महापालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे.
मुंबईकरांनो,
हवामान खात्याने नोंदविलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर १७ मे रोजी होणारी लसीकरण मोहीम सर्व केंद्रावर बंद राहील.
घरी रहा सुरक्षित रहा अशी अशी आपणास विनंती#MyBMCVaccinationUpdate #CycloneTauktae https://t.co/9K2z2XGfad
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 16, 2021
तौत्के चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोबतत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापालिकेकडून आज ट्वीटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारने केली मोठी सोय !
- लग्नाच्या दिवशीच वधूची प्रियकरासोबत गळफास घेत आत्महत्या!
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

