लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही कोरोना टेस्ट करून घेतली आहे. सुदैवाने अमित देशमुख यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर प्रत्येकाने स्वत:हून तपासणी करून घेतली पाहिजे, असे वैद्यकीय निर्देश दिले.
यानंतर मी मुंबईच्या जेजे रुग्णालयात कोरोना टेस्ट करुन घेतल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोना चाचणी करून घेतली. बुधवारी त्याचा अहवाल कोरोना निगेटिव्ह असून काळजीचे कारण नाही.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘सर्दी, खोकला, ताप असेल तर घाबरून जाऊ नका. आपला आजार, लक्षणे लपवू नका. आपल्यामुळे आई, वडील, कुटुंब, शेजारी व समाजात संसर्ग होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे असे स्पष्ट करीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले. असं वृत्त लोकमत ने प्रसिद्ध केलं आहे.
I underwent #Covid19Testing. I am negative, no virus. I had symptoms like cough & then fever. Doctors examined me at the #FeverClinic #SirJJHospitalMumbai & advised a test. #DrTatyaraoLahane & team administered the procedure. I am fine. @OfficeofUT @AjitPawarSpeaks @bb_thorat
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) April 8, 2020
कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे.


