मुंबई : ‘कोरोना’ विषाणू सध्या काळजीचा तसेच चिंतेचा विषय बनला आहे. तसेच या ‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी आपण सर्वांनी सरकारला सहकार्य केलं पाहिजे. तर दुसरीकडे आपल्या व्यक्तिगत स्वच्छतेकडे देखील लक्ष्य दिलं पाहिजे. तसेच हात धुण्यासोबतच ‘विषाणू’पासून दूर राहण्यासाठी आवश्यक आहेत पुढीलप्रमाणे ‘या’ गोष्टी….
सध्याच्या काळात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाहेर जाणे टाळा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. आरोग्याची आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे प्रथम कर्तव्य आहे. याचप्रमाणे आवश्यकता नसल्यास प्रवास टाळा. अतिमहत्त्वाच्या कामानिमित्त प्रवास करायचाच असेल तर स्वच्छता राखा.
या काळात व्यक्तिगत स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही वस्तूला स्पर्श केल्यास हात स्वच्छ करा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हात चेहऱ्याच्या जवळ नेऊ नका. तोंडाला, डोळ्यांना सतत हातांचा स्पर्श करू नका. तसेच सॅनिटायझर, मास्क वापर करा.
याचप्रमाणे या काळात योग्य आहार घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सकस आहाराने आपण आजाराशी सहज सामना करू शकतो. याचप्रमाणे याकाळात शिळे अन्न खाणे टाळा. तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, दुध, दुपारचे ताक इ. गोष्टींचा आहारात समावेश करा. दरम्यान, बाजारातून आणणाऱ्या प्रत्येक गोष्ट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

