अहमदनगर : कोरोनाचा रुग्ण अहमदनगरमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. चाळीस जणांचा एक चमू दुबईला गेला होता. त्यामधल्या एकाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे आता राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 17 वरुन 18 झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहणाऱ्या या व्यक्तीला करोनाची लागण झाली हे समोर आलं आहे. या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तसेच करोना लागण झालेले रुग्ण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळले होते. आता अहमदनगरमध्ये करोनाचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, राज्यात करोनाग्रस्तांची संख्या 17 वरुन 18 वर पोहचली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. एवढंच नाही तर त्यांनी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय द्यावा असंही आवाहन केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
