पुणे : राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हाप्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
पुणे विभागात ‘कोरोना’बाधिताचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, त्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येतील,’ असा निर्णय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे.
तसेच यावेळी बोलताना म्हैसेकर यांनी सांगितले की, ‘आधीपासूनच ‘कोरोना’बाधिताच्या मृतदेहावर गॅस किंवा विद्युतदाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची स्पष्ट सूचना होती. परंतु रुग्णाच्या मोजक्या कुटुंबियांना यामध्ये सहभागी होण्याची मुभा होती.
दरम्यान, कोरोनाबाधित मृतदेह हाताळणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट, सॅनिटायझर अशा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचनाही म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. तसेच देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
