Share

‘कोरोना फक्त जनतेमुळे होतो ? शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का?’

Published On: 

🕒 1 min read

सिंधुदुर्ग : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. भाजपकडून आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.

भाजपच्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत असतानाच भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाचा व्हिडीओ शेअर करत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

भास्कर जाधव यांचे पुत्र आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे धार्मिक स्थळ बंद ठेवण्याच्या आदेशाला हरताळ फासत एका मंदिरात धार्मिक विधी करताना दिसत आहेत. त्यामुळे आमदार-खासदारांच्या मुलांना नियम लागू होत नाहीत का ? कोरोना फक्त सामान्यांमुळे होतो का ? असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित करत टीकास्त्र सोडलं आहे.

‘जनतेसाठी मंदिर बंद आणि शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या मुलासाठी नियम नाही का? फक्त जनतेमुळेच कोरोना होतो का ? यांनी कुठले पुण्य केले आहेत ?’ अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. एकीकडे सामान्य नागरिक शासनाचे नियम पाळून आपले धार्मिक विधी करत असतील आणि लोकप्रतिनिधी मात्र ताकदीचा गैरवापर करत असतील तर हे चुकीचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!