Share

कोरोना वाढतोय : मंगल कार्यालये, नाईट क्लब व खासगी कार्यालयांवर आजपासून धाडसत्रे सुरु

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत आहे. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

यामुळेच आता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार लग्‍न समारंभाची मंगल कार्यालये, जिमखाना, नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं, खेळाची मैदाने व उद्याने, सार्वजनिक ठिकाणे, शॉपिंग मॉल, सर्व खासगी कार्यालये या ठिकाणी अचानक धाड टाकण्यात येणार आहे.

त्या ठिकाणी मास्‍कचा वापर होत नसेल आणि ५० पेक्षा अधिक व्‍यक्‍ती एकावेळी आढळल्‍यास त्या व्यक्तीकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. तसेच त्‍या-त्‍या आस्‍थापनांवर गुन्‍हे दाखल करण्‍याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

लग्‍नसोहळ्यांचे आयोजन होणारे सभागृह, मंगल कार्यालये येथे नियमितपणे तपासणी करण्याचे आदेश सर्व २४ सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागात दररोज किमान पाच जागांवर धाड टाकून नियमांचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई केली जाणार आहे. तर लग्‍नाचे आयोजक, पालक व संबंधित व्‍यवस्‍थापनांवर देखील गुन्‍हे दाखल करण्यात येणार आहेत. असे धाडसत्र नाईट क्लब, उपहारगृहं, चित्रपटगृहं, सर्वधर्मिय स्‍थळं आदी ठिकाणीही होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!