बिडकीन : बुधवार दिनाक -१७ फेब्रुवारी २०२१ रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे मंत्री अनिल परब, मंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या उपस्थितीत औरंगाबाद विभागातील पैठण तालुक्यातील बिडकीन पैठण,व पाचोड येथील बस स्थानके बि ओ टी तत्वावर बांधण्या संदर्भात बैठक संपन्न झाली.
पैठण तालुक्यातील पैठण पाचोड, विषेश करून बिडकीन बस स्थानकाची खुपच दुरावस्था झाली आहे. अनेक वर्षांपासून बिडकीन बस स्थानकात होणारी, गैर सोय अस्वच्छता या साठी आता पर्यंत नागरिकांनी अनेक आंदोलन केली. ३ वर्षा पुर्वी तत्कालीन परीवहन मंत्री यांनी दखल घेऊन बिडकीन बस स्थानका ची स्वच्छता व स्वच्छता गृह बांधकाम चे आदेश दिले.
मात्र, ओबड धोबड कामे करून परस्पर बील उचलले हे प्रकरण सुध्दा गाजले होते. प्रसार माध्यमात बिडकीन बस स्थानकाची दुरावस्था विषयी बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. याची दाखल घेत अखेर . राज्याचे फलोत्पादन मंत्री भुमरे यांनी मंत्रालयात हा प्रश्न नेला. त्यामुळे बस स्थानकाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली.


