🕒 1 min read
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. (Maharashtra ST bus strike) तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. राज्य सरकारने संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. असे असतांनाच आता एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारला एक पत्र लिहून आपल्या वेदना मांडल्या आहेत. तसेच सरकारकडे स्वेइच्छा मरणासाठी परवानगी मागितली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. या संदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहेत असे हृदयद्रावक पत्र एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे. एखादे सरकार आपल्या जनतेबद्दल किती निगरगट्ट, संवेदनाहीन, मुर्दाड आणि क्रूर असू शकते त्याचे हे उदाहरण आहे’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहेत असे हृदयद्रावक पत्र एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीले आहे.
एखादे सरकार आपल्या जनतेबद्दल किती निगरगट्ट, संवेदनाहीन, मुर्दाड आणि क्रूर असू शकते त्याचे हे उदाहरण आहे. pic.twitter.com/5IL227G3d2— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 7, 2022
दरम्यान, पाथर्डी येथील एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून त्यामध्ये ‘संपाच्या काळात ६७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आमच्याही मनात सतत आत्महत्येचा विचार येत आहे. मात्र, आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे सरकारनेच आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी द्यावी,’ अशी मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘कोरोना, भीती आणि धास्ती असे भूत जगाच्या मानगुटीवर बसलेत’
- निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
