अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील आठ दिवसांपासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रविवारी दिवसभरात अवघे २५६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.
आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३ हजार ८३ एवढी झाली असून आत्तापर्यंत ५० हजार १९ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ३०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.२३ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ८०८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६१ आणि अँटीजेन चाचणीत १०७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, अकोले१४, जामखेड ४, कोपरगाव २, नगर ग्रामीण २, नेवासा १, पारनेर २, पाथर्डी ३, राहाता १, श्रीगोंदे १५, कॅंटोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये, मनपा १७, अकोले २, कर्जत १, नगर ग्रामीण ७, नेवासे ५, पारनेर ४, पाथर्डी १, राहता ६, राहुरी ५, संगमनेर ९, श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये, मनपा ११, जामखेड ८, कर्जत १४, कोपरगाव १, नगर ग्रामीण ४, नेवासे ४, पारनेर १०, पाथर्डी २०, शेवगाव ३२, श्रीगोंदा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित ‘धनादेश’ देऊन ठाकरेंनी दाखवली तत्परता
- टीआरपी घोटाळ्याप्रकरणी ‘अर्णब गोस्वामी’ची उच्च न्यायालयात धाव
- सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची यशस्वी चाचणी
- ‘अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या परिस्थितीचे गांभीर्य शासनाच्या लक्षात आले आहे’
- कोरोनाविरोधातील लढ्यासाठी केंद्राने आतापर्यंत राज्यांना 1352 कोटी रुपये केले जारी


