मुंबई : कोरोनाने मुंबईमध्ये चांगलेच हात पाय पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका यापूर्वी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ टेस्ट करायची. त्यामुळे त्या लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह यायचा. मात्र त्याच व्यक्तीला काही दिवसाने करोना झाल्याचं स्पष्ट समजायचं.
यामुळे करोनाबाधिताच्या घरातील व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणे जाणवत नसतील तर त्याची तात्काळ तपासणी करण्यात येणार नाही, असं पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. पालिकेने तसं परिपत्रकही काढलं आहे.
या परिपत्रात म्हटलं आहे की, ‘करोनाबाधितांच्या संपर्कातील लोकांमध्ये तात्काळ करोनाची लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे पाच दिवस देखरेख करूनच त्यांची टेस्ट करण्यात यावी, असं परिपत्रकात नमूद केलं आहे. आयसीएआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. असं वृत्त महाराष्ट्र टाइम्स ने दिलं आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या घटणार असून टेस्टसाठी लागणारा वेळही वाचणार आहे. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची टेस्ट तात्काळ न करता पाच दिवसांच्या देखरेखीनंतरच त्याची टेस्ट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

