Share

‘कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही’

Published On: 

सातारा : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहचली आहे.

कोरोनाचा हाहाकार; देशात 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची स्थिती

महाराष्ट्रात काल 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

एका बाजूला ही आकडेवारी असताना दुसऱ्या बाजूला करोनावरील इंजेक्शन निघाले आहे. पण ते आपल्याला परवडणारे नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते सातार्‍यातील विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते.न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

जाणून घ्या खरंच भारतापेक्षा स्वस्त पेट्रोल-डीझेल पाकिस्तानात मिळतंय का ?

शरद पवार म्हणाले कि, आता आपल्याला करोनासोबतच जगावे लागणार आहे. आत्मविश्वासाने उभे राहणे, स्वत:ची काळजी घेणे, हाच पर्याय आहे. करोनावर इंजेक्शन निघाले आहे. पण, ते आपल्याला परवडणारे नाही. आपल्या देशात मिळत नाही. 30 ते 35 हजार रुपये आपल्या माणसाला परवडणारे नाही, असे त्यांनी सांगितले आहे. मुंबई-पुण्यातून बाहेर गेलेली लोक पुन्हा येऊ लागली आहेत. त्यामुळे करोना रुग्ण आणखी वाढण्याची भीतीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!