Share

कोरोनाचा हाहाकार; देशात 5 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित, जाणून घ्या राज्याची स्थिती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्या कमी होताना दिसत नाही आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना रुग्ण संख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८ हजार ९५३ वर पोहचली आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशात एकूण मृतांची संख्या 15 हजार 685 वर पोहोचली आहे. कालअखेर देशात 79 लाख 96 हजार 707 चाचण्या झाल्या आहेत. काल (25 जून) देशात 2 लाख 20 हजार 479 चाचण्या झाल्या. तर एकूण 2 लाख 95 हजार 881 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 58.13 टक्के इतका आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 1 लाख 97 हजार 337 इतके आहेत. गेल्या 24 तासांत 10 हजार 244 रुग्ण बरे झाले आहेत.

ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज ‘लालपरी’तून जाणार विठाईच्या भेटीला

महाराष्ट्रात काल 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. परवा 4 हजार 841 रुग्णांची नोंद झाली होती. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या पार गेली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 52 हजार 765 वर पोहोचली आहे. यापैकी 79 हजार 815 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 65 हजार 829 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!