सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकूण १९ जागांपैकी भाजपने ११ जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीला आठ जागांवर समाधान मानावे लागले. भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. आता या बँकेची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ही निवड येत्या १३ जानेवारी रोजी होणार आहे.
महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात होते. भाजपच्या गोटात अध्यक्षपदासाठी अतुल काळसेकर, मनीष दळवी, विठ्ठल देसाई या तिघांची नावे भाजपच्या गोटात चर्चेत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री नारायण राणे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी सतीश सावत यांचा पराभव करून शिवसेनेला धक्का देत निवडून आलेले विठ्ठल देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे.
१३ जानेवारी रोजी दुपारी अध्यक्ष, उपाध्यक्ष कोण हे स्पष्ट होणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रखरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून होते. जिल्हा बँकेत १२ विद्यमान संचालकांना पराभव पत्करावा लागला होता.
महत्वाच्या बातम्या
- प्रियांका चतुर्वेदींनी ब्लॉक करताच राम सातपुते म्हणाले, “एवढा राग आरोग्यासाठी चांगला नाही मॅडम”
- “भुजबळांनी मला शिकवू नये, त्यांना काय माहिती आयुष्यातील…”, चंद्रकांत पाटीलांनी सुनावले
- साखर कारखान्यांना प्राप्तीकरापासून मुक्त करण्याचा निर्णय-चंद्रकांत पाटील
- “पंतप्रधान देशाचे आदरणीय नेते आहेत, पण त्यांना हे नाटक शोभत नाही”
- ‘पंतप्रधान मोदींच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये’

