Share

राजकीय हस्तक्षेपामुळे नागपुरात कोरोना बळावला;नितीन राऊत यांचा भाजपवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : शहर लॉकडाऊन होते तेव्हापर्यंत कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात होते. मात्र राजकीय हस्तक्षेप वाढत गेल्यानेच कोरोनाच्या संसर्गाची गती झपाट्याने वाढली असल्याचा आरोप पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांवर काल केला आहे.

महापालिका प्रशासन अतिशय चांगले काम करते आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी प्रशासनाचे निर्णय कौतुकास्पद असून, जो पर्यंत शहर प्रशासनाच्या अमलांत होते तोपर्यंत शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती पण अनलॉकच्या काळात राजकीय हस्तक्षेप होण्यास प्रारंभ झाला आणि स्थिती हाताबाहेर गेली असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले.

लॉकडाऊनबाबत घेतले जाणारे निर्णय आयुक्तांच्या अधिकारांत बसतात. त्यात कोणत्याही राजकीय पुढाऱ्याला  हस्तक्षेप करता येत नाही. पालकमंत्री म्हणून मलाही त्यात ढवळाढवळ करता येत नाही असे सांगताना, राऊत यांनी पुढील काळात राजकीय हस्तक्षेप संपुष्टात आला नाही तर, हा प्रकार सर्वसामान्यांच्या जीवावर बेतू शकतो अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शहरातील कोरोनाच्या स्थितीची संपूर्ण माहिती व पुढील वाटचालीची कल्पना दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या-

चंद्रपूर जिल्ह्याला २०० युनिट विज मोफत द्या;आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपाल यांना निवेदन

कुर्बानी ने कोरोना जाणार का ? दरेकरांचा शरद पवारांना सवाल

खरीप हंगामाकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!