Share

विधानपरिषद निवडणूक : राज्यात पुन्हा रंगणार सरकार विरुध्द राज्यपाल सामना ?

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासूनच राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात अनेकदा वादाचे प्रसंग आल्याचं आख्ख्या राज्यानं पाहिलं आहे. या वादाचा पुढचा अंक आता येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर निवड होण्यासाठी बाकीच्या ९ रिक्त जागांसाठी देखील निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या लॉकडाऊन काळात या निवडणुका घेण्यात याव्यात, यासाठी बरेच प्रयत्न झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातल्या विधानपरिषदेवरच्या एकूण १० जागा रिक्त झाल्या आहेत. या सर्व राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या जागा आहेत. याशिवाय अजून २ जागा येत्या १५ जून रोजी रिक्त होत आहेत. त्यामुळे आता या जागांचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

आतापर्यंत ३७ हजार ३९० रुग्णांना घरी सोडले, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

या राज्यपाल नियुक्त जागा असल्यामुळे त्यासाठी निवडणूक घ्यावी जरी लागणार नसून राज्यपालांनाच त्या जागांवर नियुक्ती करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. मात्र, गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ विधानपरिषद आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी सदस्यांची नियुक्ती करायला राज्यपालांनी नकार दिला होता. त्यामुळे आता या जागांच्या बाबतीत राज्यपाल काय निर्णय घेतात, हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्य सरकारकडून पाठवलेल्या शिफारशींवर राज्यपाल नियुक्तीचा निर्णय घेत असतात. या १२ जागांसाठी राज्य सरकारमधल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यांची नियुक्ती करायची किंवा नाही, याचा निर्णय राज्यपालांच्या हातात असल्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकजा राज्यपाल विरूद्ध राज्य सरकार असा सामना पाहायला मिळू शकतो.

आपण जे बोलतो ते करतो का, याचा विचार करा; ठाकरेंना फडणवीसांचा टोला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!