Share

कोरोना उपचारांसाठी रेमडेसिवीरची १० हजार इंजेक्शन्स खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.

आरग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार कोरोना उपचारांमध्ये गुणकारी ठरत असलेल्या रेमडेसिविरची १० हजार इंजेक्शन बांग्लादेशकडून खरेदी करणार आहे. तत्पूर्वी, रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचा दावा अमेरिकेकडून कऱण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयानेही याआधी भारतात करोना रुग्णांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचं सांगितलं होतं.

कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

कोरोनावर लस विकसित करण्याचे काम संपूर्ण जगभरातील संशोधक, डॉक्टर्स करत आहेत. त्याच दरम्यान बांगलादेशमधील बेक्सिमको फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीने कोरोनावर प्रतिबंध करणारे औषध काही दिवसांपूर्वी बनवल्याचा दावा केला होता. सध्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जे औषधे वापरली जात आहेत त्यापैकी रेमडेसिवीर या औषधाचा रुग्णांवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही याला दुजोरा दिला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!