Share

कोरोना कामकाजातून शिक्षक झाले मुक्त; दिवाळी आधी भेट मिळाल्याची व्यक्त केली भावना!

Published On: 

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे गंगापूर तालुक्यातील कोरोनाच्या प्रतिबंधात्मक कामकाजासाठी, लसीकरणासाठी नियुक्त शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश तहसिलदार सतीष सोनी यांनी शिक्षक संघाच्या पत्राचा संदर्भ देत दिले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी शिक्षकांना एकप्रकारे दिवाळी भेट मिळाली आहे.

कोरोनाच्या प्रतिबंधात्मक कामकाजासाठी नियुक्त शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची मागणी शिक्षक संघाने तहसिलदार व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली होती. यावर गटशिक्षणाधिकारी विजय दुतोंडे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या निवेदनाचा संदर्भ देत तहसिलदारांना पत्र लिहित कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. मागील दीड वर्षात कोरोना काळात जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी कोरोना संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत विविध जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. सध्याही तालुकाभरातील अनेक शिक्षकांना कोविड संदर्भातील लसीकरण व इतर काही जबाबदारी देखील देण्यात आलेली असल्याने गोंधळ निर्माण झाला होता.

शिक्षण आयुक्तांच्या शाळा सुरू करण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक कामकाजाकरिता शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शाळा सुरू झाल्या असल्यामुळे शिक्षकांना शाळेवर रुजू होण्याकरिता या कामकाजामधून कार्यमुक्त करण्याबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेस कळवून शिक्षक शाळा स्तरावर लवकरात लवकर रुजू होतील, याची दक्षता घ्यावी. असे स्पष्ट नमूद करण्यात आलेले असतानाही तालुकाभरात शिक्षण विभागाकडून याबाबत कोणत्याही हालचाली झालेल्या नव्हत्या. तरी याबाबत तहसीलदारांनी जातीने लक्ष घालून पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण व्हावी व शिक्षकांना या कामकाजातून कार्यमुक्त करण्यासाठीचा निर्णय त्वरित घ्यावा, असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!