Share

कोरोना अलर्ट! उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात ७८३ बाधीत ; १८ जणांचा बळी

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यास कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गुरूवारी जिल्ह्यात ७८३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर १८ जणांचा बळी गेला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा आता ३७४४८ पर्यंत वाढला आहे. त्यापैकी २९६६७ जण यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज घेवून घरी परतले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ९०३ जणांचा मृत्यू झाला असून ६८७८ जणावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

६५३ जणांनी दिवसभरात कोरोनावर मात करून डिस्चार्ज घेतला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील ३६७ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते तर २५१० जणांची रॅपिड ॲन्टीनज टेस्ट करण्यात आली होती. यापैकी ७८३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात उस्मानाबाद तालुक्यातील २०५, तुळजापूर ८८, उमरगा ८८, लोहारा ४३, कळंब १३५, वाशी ६४, भूम ४६ तर परंडा तालुक्यातील ११४ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनामुळे दिवसभरात १८ जणांचा मृत्यू झाला आहे.

यात उस्मानाबाद, कानेगाव, डिकसळ, खेड, हिंगळजवाडी, कुक्कडगाव, डोंजा, सोनारी, ताकमोडवाडी, मेडशिंगा,वाणेवाडी, डोंगरेवाडी, तुगाव, कवठा, कळंब, पिंपळगाव, येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १६ हजार ७५७ जणांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३७४४८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचे शेकडा प्रमाण २८.५१टक्के आहे. जिल्ह्याचा कोरोनाचा मृत्यूदर २.३६ टक्के तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.६६ टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!