Share

पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही-फारुख अब्दुल्ला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे आणि तो पाकिस्तानकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही,तसेच काश्मीरचा जो भाग भारताकडे आहे, तो भारताचा हिस्सा आहे कितीही युद्ध झालं तरी हे बदलणार नाही, अशी मुक्ताफळे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे जेष्ठ नेते फारुख अब्दुल्ला यांनी उधळल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे

नक्की काय म्हणाले फारुख अब्दुल्ला
केंद्र सरकारने काश्मीर शांततेसाठी नेमलेले संवादक दिनेश्वर शर्मा यांच्या चर्चेविषयी अधिक टिप्पणी करणार नाही. त्यांनी केवळ चर्चा केली आहे. केवळ चर्चेने प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आहे. भारत सरकारला पाकिस्तानच्या सरकारसोबत चर्चा करायला हवी, कारण काश्मीरचा एक भाग त्यांच्याकडेही आहे.’भारत सरकारला काश्मीरमध्ये शांतता हवी असेल तर सरकारने पाकिस्तानसोबतही चर्चा करायला हवी. यात काश्मीरच्या दोन्ही भागांना स्वायत्तता द्यायला हवी. काश्मीर चारही बाजुंनी अण्वस्त्रसंपन्न राष्ट्रांनी घेरलेलं आहे, त्यामुळे काश्मीरची स्वातंत्र्याची मागणी योग्य नाही.पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे आणि तो पाकिस्तानकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!