मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना अपेक्षित असलेल्या महागाई कमी होण्याच्या विश्वास आणि आशेसंदर्भातील माहिती जाणून घेण्याकरिता एक सर्वेक्षण सुरु केले आहे. या सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. रिझर्व्ह बँक नियमित हे सर्वेक्षण करते यामाध्यमातून महत्त्वाची माहिती मिळवली जाते.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. यामध्ये १८ शहरांमध्ये वैयक्तिक उपभोगाच्या आधारावर जवळजवळ ६, ००० घरांमध्ये महागाई आणि किंमत बदल यासंदर्भातील ग्राहकांच्या वैयक्तिक मतांचा अभ्यास केला जाणार आहे.
यामध्ये ग्राहकांना तीन महिने ते एक वर्ष काळात झालेल्या किमतीतील बदलांवर तुलनात्मक माहिती विचारली जाते. त्याच बरोबर ग्राहक विश्वास सर्वेक्षण सामान्य आर्थिक स्थिती रोजगार, वस्तू आणि सेवांच्या किंमती, परिवारांचा उत्पन्न खर्च यावर देखील प्रश्न विचारले जातात.
हे सर्वेक्षण अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, तिरुवनंतपुरम, मुंबई, पटना, लखनऊ, कोलकाता, जयपुर हैदराबाद, गुवाहाटी, भोपाळ या शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये या तेरा शहरातील जवळजवळ 5, 400 लोकांचा सर्वेक्षण केले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नथुराम गोडसेबाबत तुमचं मत काय आहे? ओवैसींचा भागवत यांना सवाल
- गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली येरवडा मध्यवर्ती कारागृहाची पहाणी
- अजितदादा, आमच्याकडे चहाला या; फडणवीसांनी दिलं खास आमंत्रण
- चाहत्याने भरलं रोहित, गिल आणि पंत यांच्या जेवणाचं चक्क ‘इतकं’ बिल
- लक्षात येतेय का थयथयाटाचे कारण? भाजप नेत्याचा राऊतांवर हल्लाबोल


