🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची एका सभेत खिल्ली उडवली आहे. अजूनही काँग्रेसची चौथी पिढी सापांचा खेळ दाखवून जनतेकडे मतं मागत आहे. याआधीचे काँग्रेस नेते देखील परदेशी पाहुण्यांना सांप-मुंगुसाचा खेळ दाखवून त्यांना खूश करायचे. अशा शब्दात मोदींनी प्रियांका गांधींची खिल्ली उडवली आहे. बिकानेर येथील प्रचार सभेत मोदी बोलत होते.
यावेळी मोदी म्हणाले की, एक जमाना असा होता की काँग्रेसचे नामदार परदेशी पाहुण्यांना सांप-मुंगुसाचा खेळ दाखवून त्यांना खूश करायचे. आज या नामदारांची चौथी पिढी हेच काम करीत आहे. ही चौथी पिढी आजही साप-गारुडय़ाचा खेळ दाखवून मत मागत आहे. पण ते विसरले आहेत की, भारत आता माऊस (कॉम्प्युटरचा माऊस) फिरवून सापाच्या पुढे गेला आहे. भारत आता माऊसचा गारुडी आहे. तो कॉम्प्युटरचा माऊस चालवीत आहे , असे मोदी म्हणाले.
मोदींच्या या टिकेला रायबरेली मधील प्रियांका गांधी यांच्या साहसीपणाचा संदर्भ होता. रायबरेली येथे प्रचारादरम्यान गेल्या असता प्रियंका गांधी यांनी हातात साप घेऊन त्याच्याशी खेळल्या. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्या साहसीपणाची वाह – वाह झाली. मात्र नरेंद्र मोदी यांनी प्रियांका गांधी यांच्या या साहसाची खिल्ली उडवली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

