मुंबई : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने केंद्रात चांगलं यश मिळवत मोदी सरकारची स्थापना केली. यानंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या आक्रमक बाण्यामुळे काँग्रेससह इतर पक्षांमधून जोरदार इनकमिंग करून घेत विविध राज्यांमध्ये भाजपने आपली सत्ता आणली. तर, दुसरीकडे काँग्रेसला मात्र मोठं अपयश सहन करावं लागलं.
२०१९ मध्ये देखील काँग्रेसला जिव्हारी लागणाऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाराष्ट्रात मात्र विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या राजकीय नाट्यानंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघडी सरकारची स्थापना केली. दरम्यान, मोदी सरकारच्या कारभाराविरोधात आता काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. महागाई, कोरोना काळ, चीनची कुरघोडी, कृषी कायदे अशा अनेक मुद्द्यांवरून आंदोलन करत काँग्रेसने मोदी सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
संसदीय समितीच्या बैठकीत राहुल गांधीजींनी पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान या देशांशी संबंधित प्रश्न उपस्थित केले तर चर्चा करायची हिम्मत नाही…
आणि म्हणे ५६ इंच ????
चौकीदार गप्प का??— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) July 17, 2021
राज्यातील काँग्रेस नेत्यांनी देखील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘संसदीय समितीच्या बैठकीत राहुल गांधीजींनी पाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान या देशांशी संबंधित प्रश्न उपस्थित केले तर चर्चा करायची हिम्मत नाही…आणि म्हणे ५६ इंच,’ असा टोला भाई जगताप यांनी लागवतानाच चौकीदार गप्प का? असा सवाल देखील केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर कोल्हापूर जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश; सर्व प्रकारचे दुकाने होणार सुरु
- पंढरपुरात संचारबंदी! चारशे वारकऱ्यांसाठी तीन हजार पोलीस तैनात
- पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राज्यात उलथापालथ होण्याची शक्यता ? चंद्रकांत पाटलांनी दिलं ‘हे’ उत्तर
- ‘भाजप ही वॉशिंग मशीन इथे डाकू पण साधू होतात’ ; राष्ट्रवादीचा टोला
- कोरोना नियमांचे उल्लंघन; आमदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल


