Share

भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय ; राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र नाही – प्रकाश आंबेडकर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषेत काँग्रेसचे कौतूक करताना राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली आहे. काँग्रेससोबत युती करायची आमची इच्छा आहे, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत कदापी एकत्र येऊ शकत नसल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे. कारण, भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी नेहमीप्रमाणे संघ परिवार आणि मोहन भागवत यांच्यावर टीकाही केली.

भारिप बहुजन महासंघाने आगामी निवडणुकांसाठी एआयएमआयएमसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर, प्रकाश आंबेडकरयांच्यावर टीका करण्यात आली. मात्र, आपल्या या निर्णयाचे समर्थन करताना आंबेडकरांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही. त्यांच्याच पक्षातील उदयनराजे भोसले संभाजी भिडेंचे जाहीरपणे कौतूक करतात. त्यामुळे आम्ही कदापी राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही. 2014 च्या निवडणुकीनंतर शिवसेना भाजपाला पाठिंबा द्यायला तयार नव्हते. राष्ट्रवादीने आमदारांच्या दबावाखाली सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर जाण्यात आम्हाला अडचण आहे. तसेच भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये आहेत.

उदयनराजे हे भिडेंची बाजू मांडतात मग त्यांच्या प्रचाराला आम्ही कसं जाणार ? असा प्रश्न उपस्थित करत आंबेडकर यांनी भारिप आणि एमआयएमच्या युतीचे समर्थन केले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!