टीम महाराष्ट्र देशा – कोरोनामुळे देशात लॉक असूनही नियम भंग करून खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करणारे वाधवान यांच्या वरून आता राजकारण चांगलाच तापलं आहे. आता यावरून कॉंग्रेसनेही भाजपवर आरोप केला आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीटर वरून भाजपवर घणाघात केला आहे. वाधवान ग्रुप हा भाजपचा प्रमुख देणगीदार राहिला आहे. त्याच्याबदल्यात भाजपाने वेळोवेळी वाधवानची मदत केलेली आहे. वधवानची कंपनी प्रीव्हिलेज हाय-टेक विजयदुर्गा बंदर विकसित करते आहे, ज्यामध्ये बीजेपीचे खासदार आणि मोदीजी यांचे निकटवर्तीय आर. चंद्रशेखर भागीदार आहेत. म्हणून किरीट सोमय्या यांचं खोट ढोंग काही उपयोगाचं नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
तसेच वाधवान कुटुंबातील २३ जणांच्या महाबळेश्वरला जाण्यास परवानगी देणारे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती ही फडणवीस सरकारनेच केलेली आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी जे पत्र देण्यात आले त्यामागे भाजपाच्याच बड्या नेत्याने ‘शब्द टाकला’ असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे. राज्य सरकारने गुप्तांवर कारवाई केलेली आहे, आता पुढची कारवाई मोदी सरकारने हिम्मत असेल तर करावी, असेही सावंत म्हणाले.
Wadhwan grp has been main donors for @BJP4India DHFL HDIL RKW all funded BJP. Wadhwan's company Privilege high-tech developing Vijaydurga port in which Bjp's MP and close aide of Modi ji R. Chandrashekhar is a partner. Hence false pretence of @KiritSomaiya won't work. https://t.co/WfMKWtSz4w
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 10, 2020
Amitabh Gupta was appointed by Fadnavis govt which kept supporting Wadhwans. It can not be ruled out that someone higher up from BJP may hv influenced help for them. #MaharashtraVikasAghadi govt has taken immediate action against Gupta. Modi govt must take action to come clean
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) April 10, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

