Share

अरे देवा ! काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कोणत्या मंत्र्यांच्या घरी ऐकू आल्या पक्षविरोधी घोषणा

Published On: 

नागपूर : काँग्रेसमधील गटबाजी काही नवीन नाही . मुंबई दिल्लीहून आलेल्या वरीष्ठ नेत्यांनाही त्याचा अनुभव अधुनमधून येत असतो. काल नागपुरात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना तो अनुभव आला. झाले असे की, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरी जेवणासाठी गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकाराने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच महसूलमंत्री बाळासाहेब चांगलचे भडकले. हा प्रकार बंद करा, नाही तर मी निघतो, असा निर्वाणीचा इशारा दिल्यानंतर पालकमंत्र्यांचे समर्थक शांत झाले.

थोरात कोरोनाचा आढावा घेण्यासाठी नागपूरला आले होते. पालकमंत्र्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था घरी केली होती. बाळासाहेब येताच पालकमंत्र्यांच्या काही उत्साही समर्थकांनी विकास ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरूवात केली. ठाकरे हटाव, काँग्रेस बचाव, अशा घोषणा ते देत होते. त्यामुळे थोरात चांगलेच भडकले. ही जागा राजकारण करायची नाही. मी येथे जेवायला आलो आहे. घोषणाबाजी करत असाल तर मी न जेवताच निघतो, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. नाईलाज झाल्याने कार्यकर्ते शांत बसले. घोषणाबाजी सुरू असताना पालकमंत्री राऊत तेथेच उपस्थित होते.

नागपूरमधील काँग्रेसची गटबाजी सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस नेत्यांमधील मतभेद टोकाला गेले होते. त्यातील राऊत समर्थकांमध्ये सर्वाधिक नाराजी होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी एबी फॉर्म द्यायला गेलेल्या अभिजित वंजारी यांची गाडीसुद्धा रोखली होती. मनपाच्या निवडणुकीच्या निकालानंतरही गटबाजी कायम आहेच. फक्त एकमेकांचे समर्थक मात्र आता बदलले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीच्यावेळी वरून आदेश आल्यानंतर काही दिवस गटबाजी जवळपास बंद होती. महाअघाडीमध्ये काँग्रेस सहभागी झाली. राऊत यांना ऊर्जामंत्रीसोबतच पालकमंत्रीपद मिळाले. विकास ठाकरे आमदार झाले आहेत. काँग्रेसचा नव्याने कारभार सुरू झाल्याने सर्व काही शांत होईल असे वाटत होते. मात्र पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी केलेल्या घोषणाबाजीने काँग्रेसमधील गटबाजी कायम असल्याचे दिसून आले.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर;राजकिय किंमत मोजावी लागणार’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!