नागपूर : राज्यात सद्या विज बिल माफीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वाढीव विजबिलात दिवाळीमध्ये गोड बातमी दिली जाईल असं आश्वासन देणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अचानक युटर्न घेत विज बिल भरावेच लागेल असं म्हणल्यामुळे अव्वाच्या-सव्वा बिल आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाने, व्यावसायिकांनी भरायचं तरी कसं असा उद्विग्न प्रश्न निर्माण झाला आहे.
परिवहन खात्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी पॅकेज दिलं तर मग वीजबिलात सरकार का दिलासा देऊ शकत नाही? यासाठी भाजप, मनसेसह इतर पक्षांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. ऊर्जा खातं काँग्रेस पक्षाकडे तर परिवहन खातं शिवसेनेकडे असल्याने हा दुजाभाव होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. ‘वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला शॉक दिलाच पाहिजे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून जनतेत रोष आहे. राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर आहे. त्यामुळे वीजबिल माफीसाठी काँग्रेसने या सरकारवर दबाव निर्माण करावा,’ अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस सरकारने महावितरणचे तब्बल 67 हजार कोटी रुपये थकवले; जयंत पाटलांचा दावा
- मोठी बातमी : सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्ली सोडली, गोव्याच्या दिशेने रवाना
- फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करू; जयंत पाटलांनी ठोकला शड्डू
- कोरोनाची दुसरी लाट आली तर महाराष्ट्रातील सर्वांनाच महागात पडेल, राजेश टोपेंचा इशारा
- ‘…त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही’ : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

