Share

मोठी बातमी : सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी दिल्ली सोडली, गोव्याच्या दिशेने रवाना

Published On: 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवेचे प्रदुषण खूपच वाढले असल्याने ते कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीला मानवणारे नाहीं. त्यामुळे त्यांना काही काळासाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे सोनिया गांधी या आता काही दिवसांसाठी दिल्ली सोडून अन्यत्र जाणार आहेत .त्यानुसार आता सोनिया गांधी आता एका आठवड्यासाठी गोव्यात राहायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधीही असतील. दुपारी चार वाजता दोघेही गोव्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सोनिया गांधी यांनी गेल्या ऑगस्ट मध्येच रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तेव्हा पासून त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधे घ्यावी लागत आहेत. त्यांच्या छातीत वारंवार संसर्ग होत असल्याचे लक्षात आले आहे, त्यामुळे सध्याच्या प्रदुषित हवेबद्दल डॉक्टरांनी त्यांच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत त्यांना काही दिवसांसाठी दिल्लीच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला होता.

मात्र, यामुळे राहुल गांधी यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहता आले नव्हते. याच काळात भाजपने संसदेत कृषी विधेयके मंजूर करवून घेतली होती. या विधेयकांना काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. मात्र, अशा महत्त्वाच्या प्रसंगी राहुल गांधी संसदेत उपस्थित नसल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!